हरयाणामधल्या छोट्याश्या गावातून आलेली जान्हवी अस्खलित इंग्रजी बोलते, तिच्या प्रत्येक शब्दांचे उच्चार हे ब्रिटिशांसारखे आहेत. त्यामुळे तिच्या बोलण्यावर प्रत्येकजण पूर्णपणे प्रभावीत होऊन जातो. काही दिवसांपूर्वी भारतभ्रमंती करायला आलेल्या परदेशी युवतींशी तिनं इंग्रजीत संवाद साधला. तिची भाषा, उच्चार ऐकून त्याही चाट पडल्या. फक्त इंग्रजीच नाही तर 8 वेगवेगळ्या भाषा 13 वर्षांची जान्हवी बोलते. इंग्रजीबरोबरच जपानी, फ्रेंच यासारख्या भाषाही ती शिकली. विशेष म्हणजे फक्त व्हिडिओ आणि टीव्ही पाहून तिने ही भाषा आत्मसात केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews